Header Ads Widget

Responsive Advertisement

श्लोक आणि स्तोत्र

श्लोक आणि स्तोत्र

🚩 सकाळी उठताच दोन्ही हातांकडे पाहून करावा या मंत्राचा उच्चार:

कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ॥
कराग्रे वसते लक्ष्मीः: हाताच्या अग्रभागी म्हणजेच बोटांच्या टोकांवर संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मी वास करते. माणसाचे सर्व उद्योग, कर्म बोटांच्या अग्रभागाने चालतात, म्हणून तिथे लक्ष्मीचा वास मानला गेला आहे.
करमध्ये सरस्वती: हाताच्या मध्यभागी म्हणजेच तळहाताच्या मधोमध विद्या, बुद्धी आणि कला यांची देवी सरस्वती वास करते.
करमूले तू गोविन्दः: हाताच्या मूळभागी म्हणजेच पायाशी किंवा तळहाताच्या तळाशी पालनकर्ता भगवान गोविंद (विष्णू) वास करतात.
प्रभाते करदर्शनम्: अशा प्रकारे सकाळी उठल्यावर आपल्या दोन्ही हातांच्या तळहातांचे दर्शन घ्यावे.

🚩 जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी करावा या मंत्राचा उच्चार:

समुद्रवसने देवि पर्वतस्तन मण्डले।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे॥
अर्थ:
समुद्रवसने देवि: समुद्राचे वस्त्र परिधान केलेल्या देवी,
पर्वतस्तन मण्डले: पर्वतांचे मंडल (डोंगर-रांगा) हे जिचे स्तन आहेत,
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं: भगवान विष्णूची पत्नी (भूदेवी), तुला माझा नमस्कार असो.
पादस्पर्शं क्षमस्व मे: माझ्या पायांचा तुला स्पर्श होणार आहे, त्याबद्दल मला क्षमा कर.
अर्थ: "हे पृथ्वी माते, समुद्राचे वस्त्र नेसलेल्या आणि पर्वतांना धारण करणाऱ्या भगवान विष्णूची पत्नी असलेल्या देवी, तुला माझा नमस्कार असो. आजच्या दिवसाची सुरुवात करताना माझे पाय तुझ्यावर पडणार आहेत, या पादस्पर्शाबद्दल तू मला क्षमा कर."

🚩 स्नान करताना करावा या मंत्राचा उच्चार:

गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति।
नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु ॥
अर्थ:
आवाहन: हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू आणि कावेरी नद्यांनो, तुम्ही या जलानेयुक्त पाण्यात येऊन निवास करा (सन्निधिं कुरु).
प्रातःस्नान: सकाळी अंघोळ करताना अंगावर पाणी घेताना हा मंत्र म्हणतात. यामुळे सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान केल्याचे पुण्य लाभते असा समज आहे.
गंगा: भारताची सर्वात पवित्र व प्रधान नदी.
यमुना: यमुना नदी जी गंगेची प्रमुख सहायक नदी आहे.
गोदावरी: दक्षिण भारतातील सर्वात मोठी व पवित्र नदी जिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.
सरस्वती: प्राचीन व पौराणिक पवित्र नदी.
नर्मदा: मध्य भारतातील मोक्षदायिनी पवित्र नदी.
सिंधु: प्राचीन संस्कृतीची जननी असलेली ऐतिहासिक सिंधू नदी.
कावेरी: दक्षिण भारतातील अत्यंत आदराची व पवित्र नदी.

🚩 रात्री झोपण्यापूर्वी म्हणावयाचा मंत्र / क्लेश नाशक मंत्र:

ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।
प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः॥

अर्थ:
कृष्णाय: श्रीकृष्णाला वासुदेवाय: वसुदेवाचा पुत्र (वासुदेव) यांना हरये: सर्व दुःखे आणि पाप हरण करणाऱ्या हरीला परमात्मने: सर्वसाक्षी परमात्म्याला प्रणतक्लेशनाशाय: शरण आलेल्या भक्तांचे क्लेश (दुःखे/त्रास) नष्ट करणाऱ्या गोविन्दाय: गोविंदाला नमो नमः: वारंवार नमस्कार असो.

हा मंत्र आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दु:ख दूर करतो. वाईट वेळ संपवतो. तुमच्या जीवनात क्लेष असतील ते क्लेष दूर करतो. तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तर भीती सुद्धा नष्ट करतो. जीवनातील नैराश्य दूर करतो. त्यामुळे शास्त्र सांगतं की दररोज झोपण्यापूर्वी हा मंत्र म्हणावा.

" सवाई सर्जाचं चांगभलं !!! "

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या