अमावसेचे महत्व :
प्रत्येक अमावास्येनिमित्त श्री क्षेत्र वीर येथे हजारो भाविक श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरीचे दर्शन घेतात.
अमावस्येनिमित्त पहाटे ४.३0 वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात येतो.
सकाळी ६ वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात येतो.
सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात येतो. देऊळवाड्यात दगडी कासवावर पारंपरिक सालकरी गोसावी मंडळींच्या पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम सुरू असतो.
प्रत्येक अमावसेला वेगवेगळ्या अन्नदात्यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
देवस्थान ट्रस्ट, देवस्थान कर्मचारी, ग्रामस्थ भाविक भक्तांसाठी पिण्याचे पाणी, मंदिर व परिसर स्वच्छता, स्वयंसेवक, दर्शनबारी, इत्यादी ची व्यवस्था करतात.
0 टिप्पण्या