अध्यात्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या पुण्य नगरीतील पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या सासवड पासून २५ किलोमीटर आणि अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्रीखंडेरायाच्या जेजुरीपासून २२ किलोमीटर अंतरावर पुणे व सातारा जिह्ल्याच्या सीमेवर 'वीर' ( ता. पुरंदर, जि. पुणे ) नावाचे गाव आहे. येथे पूर्णगंगेच्या उत्तर तीरावर श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे पवित्र देवस्थान आहे.
एका दगडी बांधकाम असणारे ‘देऊळवाडा’ या भव्य प्राकारात हे मंदिर आहे.
पूर्वाभिमुख मंदिराची सदर, सभामंडप आणि गर्भगृह अशी रचना असून गर्भगृहात श्रीनाथ म्हस्कोबा महाराज - जोगेश्वरी माता यांच्या उत्सव मूर्ती आहेत.
श्रीनाथ म्हस्कोबा हे काशी अथवा सोनारी चे काळ भैरव असून ते कमाळाजी नामक भक्तामुळे या ठिकाणी वास्त्याव्यास आल्याचे सांगितले जाते.
हा देव स्मशान भूमीत प्रगट झाल्याने यास म्हस्कोबा असे म्हणतात.
श्री क्षेत्र वीर येथे दरवर्षी दहा दिवस माघ पौर्णिमा ते वध्य दशमी पर्यंत श्रीनाथ म्हस्कोबाची यात्रा भरते.
सवाई सर्जाच चांगभल....................!!!
0 टिप्पण्या