Header Ads Widget

Responsive Advertisement

देवांची आरती


आदिब्रम्हे शिवबीज निर्माण झाला । काशी काळभैरव म्हणती तयाला ।। 

दक्षिण दिशामाजी पूर्णगंगेतीरी आला । श्री म्हस्कोबा नावे प्रसिद्ध झाला ।

जयदेव जयदेव जय जोगेश्वरी कांता । सदभावे निजचरणी ठेवितो माथा ।। धृ ।।


जटिले भस्म दुलीत अश्वारूढ स्वारी । त्रिशूळ डमरू हाती खडगे गदाधारी ।।

असुराते मर्दोनी निजभक्ता तारी । वामांगी शोभे श्री जोगेश्वरी ।। 

जयदेव जयदेव जय जोगेश्वरी कांता । सदभावे निजचरणी ठेवितो माथा  ।। २ ।।


पूर्णगंगा उदभव पुरंदर गिरी शिखरी । विरभद्र अवतरले या गंगेतीरी ।।

भक्तकामा प्रगटोनी श्री वीरक्षेत्री । सदभक्त भावे हो भजती अंतरी ।

जयदेव जयदेव जय जोगेश्वरी कांता । सदभावे निजचरणी ठेवितो माथा  ।। ३।।


प्रेमळ भाविकभक्ता दाविसी बहुलीला । अपार भक्तांकरवी महिमा वाढविला ।।

मुनीवर ध्यातीगाती स्तवती हो तुजला । श्यामत नही सुत सदैव वंदिती पदकमला ।।

जयदेव जयदेव जय जोगेश्वरी कांता । सदभावे निजचरणी ठेवितो माथा  ।। ४।।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या